उधमपूरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना घेरले   

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. उधमपूरच्या रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जोफर गावात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना चहुबाजूने घेरले असल्याचे अधिकार्‍यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या भागात दहशतवादी असल्याची माहिती होती. त्याआधारे, सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. दोन्ही बाजूंकडून अधून-मधून गोळीबार केला जात आहे, अशी माहिती उधमपूर-रियासी विभागाचे उपमहानिरीक्षक महमद भट यांनी दिली. कठुआ जिल्ह्यातील सन्याल भागात २४ मार्च रोजी चकमक उडाली होती. त्यावेळी पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराने संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे.

Related Articles